कवितेच्या एका कडव्यात
कवितेच्या एका कडव्यात
1 min
215
कविता म्हणजे मनातले भाव
शब्दाने व्यक्त केलेला घाव
जीवनाचं सार असते राव
कवितेच्या एका कडव्यात
कविता म्हणजे मनातील वेदना
शब्दाने मांडतो त्या यातना
वाट करून देतो अनुभवांना
कवितेच्या एका कडव्यात
कविता हे सुख दुःखाचे मिश्रण
प्रेम लोभ माया विरहाचं लेपण
झळकते कधी त्यात मीपण
कवितेच्या एका कडव्यात
एकांतात मी असतो बेजार
कविता हेच देते मला आधार
जगण्याचा बळ घेतो आकार
कवितेच्या एका कडव्यात
