STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

कवितेचा विषय : नक्षत्र

कवितेचा विषय : नक्षत्र

1 min
697

गुणी जशी नक्षत्रावाणी

माय म्हणे माझी पोर!

बाप म्हणे नजरेत भरते

नस्ता होताे जिवाला घोर!!१


आसमंतात,असंख्य तारका

९ग्रह,२७ नक्षत्र व१२ राशी!

भविष्यात कश्या येतात त्या

राखित वेग, मर्यादा इतरांशी!!२


दोघांची पत्रिका असते छान

तरीही गुण मिलन होत नाही!

राक्षसगण तर कधी एक नाडी

यांतच खरा घोटाळा होत राही!!३


हे तर नक्षत्रांचे देणे

म्हणतो तरीही आपण!

कधी कधी सुचतंच कसं?

नको इतकं ते शहाणपण !!४



Rate this content
Log in