STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Others

4  

Mahesh Raikhelkar

Others

कवितेचा छंद आणी बायकोशी वाद

कवितेचा छंद आणी बायकोशी वाद

1 min
347

एके दिवशी बायको म्हणाली

नका तुम्ही कवितेच्या छंदात पडू

हे ऐकून मला आलं की हो रडू !!


मी ही मग रागातच म्हणालो ठीकंय... तर मग ऐक

रिकामा वेळ असेल तेव्हा सिगारेट ओढत बसतो !

नाहीतर फावल्या वेळेत तंबाखू-गुटखा मी खातो !

जेव्हा निवांत असेल तेव्हा दारू ढोसत बसतो !

नाहीतर नुसत्याच मग चकाटया मारत बसतो !

मोकळ्या वेळेत उगीचच कशाची तरी चिंता करतो !

नाहीतर जुगाराच्या नादी लागून पैसे मी हारतो !


वेळ घालवण्यासाठी मित्रासोबत पार्ट्या झोडतो !

बघ टुकार सिनेमे पाहण्यात मग वेळ माझा घालवतो !

मोबाईलवरील गेम खेळून चष्म्याचा नंबर वाढवतो !

ऐक शेवटी नाहीतर मग तमाशालाच जावून बसतो !

हे सर्व ऐकून बायको गेली की हो घाबरून

आणि म्हणाली अगदी ती काकुळतीला येवून

ऐका माझं भलतंच काही नका तुम्ही हो करू

त्यापेक्षा राहू द्या तुमचा कवितेचा छंद सुरु !


कवितेचा छंद सुरु !!


Rate this content
Log in