कविता
कविता
1 min
353
कविता म्हणजे काय बरं...
कविता म्हणजे,
आम्हां कवींच्या शब्दांची ओळख...
कविता म्हणजे,
आम्हां कवी - कवयित्रींची नशा - धुंदी....
कविता म्हणजे,
आमचा ध्यास...
आमचा श्वास...
आमचा अट्टाहास...
कविता म्हणजे,
आमच्या शब्दांना मिळालेली..
सुंदर वाट...
कविता म्हणजे,
शब्दांकित काव्यातून
कवीच्या चंचल मनाची ओळख...
कविता म्हणजे,
कवीची परिव्याख्या...
कविता म्हणजे,
कवीच्या लेखणीची शान...
