कविता तुझे रूप कसे
कविता तुझे रूप कसे
कविता ही काय असते
साऱ्यांनाच माहीत नसते,
आंधळ्याला ही दिसते
अन् मुक्याला ही सुचते.
शब्दांचे कोंदणं, मनातील चांदणं
प्रतिभेचं देणं,तीच खरी कविता,
कवितेत असतो, शब्द अर्थ रुप
प्रतिभेचे वरदान शब्दां शब्दास.
कवितेत दरवळतो शब्दांचा सुगंध
मानवी मनाला देई खरा आनंद,
कविता म्हणजे आत्म्यांची भाषा
सामावले त्यात ब्रम्हा, विष्णू, महेशा.
कविता म्हणजे कविताच
जणू माझा ती प्राण...,
कविता हरवीते भूक नी तहान
कविता म्हणजे कवीचं च जीन.
माझ्या पासून दूर कविता
कविता कुणावर मी करु ?
दूर जरी ती हृदयात माझ्या
तिला कसा मी विसरू...?
