कविता मनातली
कविता मनातली
हवेत कसे कविते नाते मजला
असे निखळ प्रेमाचे भाव मनी
जैसी पवित्र सरीतेचे पाणी
निरव्याज निर्मळ श्रोत तनी....
आयुष्यात प्रीती कवितेची
त्याग तपस्या वाहे भरूनी
मान सन्मान हा पदोपदी
द्यावे अन् घ्यावे तळपूनी...
जगण्याची रीतभात विचारक
अनवरत कर्मभूमीचे चींतन
देशाला समर्थ करण्या उतराई
दिनबंधूची मदत सेवा अर्चन...
हवेत असे मज असली नाती
खोटेपणा नसे ना मनमानी
अविरत ध्येयाचा बाना चढवून
व्हावे कविता समाजभिमानी...
मनात असावी धैर्य धारना
मी-पणाची अतिरेक भरारी
स्वाभिमान जपण्यासाठी
मांडावे सत्यपणा करारी...
