STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

कविता- माझा आनंद

कविता- माझा आनंद

1 min
487

माझा आनंद

माझा छंद

करावे नित्य लेखन

द्यावा वाचन आनंद

हा माझा छंद....

लिहावी कविता

आपल्या माणसावर

करावे दुःख त्याचे हलके

हसवावे त्यास थोडे

हा माझा छंद...

असावीत भवताली

जिगरी दोस्त मंडळी

बोलावे खूप, हसावे खूप

द्यावी त्यांच्या हातावर टाळी

घ्यावा- द्यावा हा आनंद

हा माझा छंद...


साहित्याला गुण द्या
लॉग इन