STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

4  

Jyoti gosavi

Others

कवीचा दिन

कवीचा दिन

1 min
780

आज आहे कविता दिन

मी माझ्या कर्तव्यात लीन

नुकती कुठे जुळवली

 मनात कडवी

तोच आली डिलिव्हरीची 

पेशंट आडवी

मग कवितेला केले टाटा

एक जीव जगात आला

करीत ट्याहा ट्याहा


नुकतेच कुठे मनात

जुळवले यमक

तोच पेशंटच्या आजाराचे

समजले गमक

औषध उपचारात त्याच्या

गेला सारा वेळ

मग दिला सोडून

शब्दांशी खेळ


नुकतीच कुठे कवितेशी

करत होते यारी

तोच राउंडला आली

मोठ्या साहेबांची स्वारी

मग काय त्यातच 

गेला सारा वेळ

सोडून दिला मग

 शब्दांशी खेळ


रात्री मग स्वप्नात कविताच आली

शब्दभांडारे केली खुली

त्यातलेच शब्द उचलून

कवितेचा हार गुंफला

आवडला की नाही सांगा बरं मला


Rate this content
Log in