कुटुंब प्रेम....
कुटुंब प्रेम....
कुटुंब प्रेम म्हणजे चार भिंतीत
नुसते एकत्र राहणे नाही.
कुटुंब प्रेम म्हणजे दूर राहून ही
नात्यांनमधला "मधाळ गोडवा" जपणं,
नुसतं पैशांनी नाहीतर मनानं ही
संकटंकाळी भक्कमपणे
एकमेकांना साथ देणे.
घर म्हंटलं की ओघानं
"मातीच्या चुली" ह्या आल्याचं ओ...!
पण.....त्या घराबाहेर काढून
रस्त्यावर कधीचं मांडू नये.
मोठ्यांनी केली कानउघाडणी
तर रागवू नये;त्यामागील त्याचं प्रेम,
आपल्यासाठी असलेली तळमळ पहा.
जेवढं भांडून मिळतं नाही ना;
तेव्हढं प्रेमाने साध्य होतं.....
कदाचित जरा जास्तीच.
कुटुंब प्रेम म्हणजे "आई-वडिलांचे संस्कार";
गुण्यागोविंदाने "एकोप्याने" राहण्याची शिकवणं.
कुटुंब प्रेम म्हणजे घरादाराचा
भक्कम असा पाया.....
मग कोणीही त्याघराकडे वाकड्या नजरेने
पाहण्याची हिम्मतच करू शकत नाही.
