Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others

3.9  

Neha Ranalkar

Others

कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा

कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा

1 min
191


*कु*सुमाग्रजांच्या कथा' वाचून ' प्रतिसाद' देत

'साहित्य सुवर्ण ' पटकावित |

*सु*रक्षित झाली मायमराठी 'मेघदूत' होऊन

'छंदोमयी' व 'पाथेय 'होत | |१| |


*मा*नवला 'राजमुकूट' म्हणून 'दिवाणी दावा'

करून 'जीवनलहरी' होत |

*ग्र*हमानाने गेली पाहत 'अंतराळ ' 'समिधा'

 स्वार्था ची टाकून 'मुक्तायन' गात | 

*ज*वळून पाहण्या 'दुरचे दिवे' 

होवून 'चांदणवेल' 'श्रावणात' | | २| |


*'वि*शाखा' वाचून ती 'विज म्हणाली धरतीला'

'एकाकी तारा' ' देवाचे घर' बघत | 

*वा*टले घ्यावा 'शोध शेक्सपिअरचा' 

'विदूषक 'रुपात 'मॅकबेथ 'होऊन | |३| |


*शि*व ओलांडून ती भाषेची 'अपॉइंटमेंट' 'महंत'

'ऑथेल्लो' ची घेतली 'मराठी माती' मधून | 

'*र*सयात्रा ' 'नटसम्राटाची' 'स्वगत' म्हणत

वाचित 'शंभर कवितां ' ची 'रूपरेषा' ठेवून | |४ | |


'*वा*दळवेल ' कोठे म्हणत 'पिंपळपान'

 होऊन 'किनारा' शोधला 'जादूची होडी'तून |

*ड*गमगली न ती'फुलराणी' 'जान्हवी' व

'काव्यवाहिनी' 'वैजयंती' होऊन | |५ | |


*क*ल्पनेच्या तीरावर ' 'कौंतेय' 'वैष्णव'

यांना भेटून ती 'ययाती देवयानी' बनली |

*र*म्य 'प्रवासी पक्षी ' होत 'सतारीचे बोल'

ऐकून 'हिमरेषा' होऊन 'आनंद'ली | |६ | |


Rate this content
Log in