STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

कटू सत्य जगण्यातले

कटू सत्य जगण्यातले

1 min
265

मनात दाटून आलेल्या असंख्य भावनांचा

नुसताच थैमान बेभान निसटत्या इच्छांचा

धडपडत सावरणाऱ्या एकट्या जीवाला

कोण कसे सांगेल कटू सत्य जगण्यातले


प्रकाशमय दिवा सुद्धा राहतो तेवत सतत 

अंधाऱ्या प्रकाशाचा अंधार निरंतर मिटवत

सावरणाऱ्या श्वासाची ओढ जळण्यात धैर्याने

मिटवणारे मिटवतात आपापल्या परि स्वार्थाने


वेड्या ध्यासापायी लढतात काही वेड्यांनिशी

संघर्षाचं देणं मिटवेल असंच अंधार प्रकाशाने

भावनांच्या कल्लोळात जगावा श्वास मोकळा

दाटलेल्या भावनांचा झेलावा वार निसटता


जीवनाच्या रंगात वेगवेगळ्या हरता हरता 

आपलीच होते कोंडी स्वप्नांच्या खोल दर्यात

निसटत्या पुसटत्या वलयांचा धसका मोठा 

शर्थ उम्मीदेची जगण्यात सुखाचा ठेवते घास


Rate this content
Log in