कठीण
कठीण
1 min
316
प्रेम मिळे सहजी
उमजणे कठीण
सुखद सा धक्का
जीव टांगणीला
बदल हवाहवासा
मन कासावीस
प्रेम की भास
मती भ्रमित
अवचित सुगंध
आतुर रातदिस
गोडगोड स्वप्ने
हरपले भान
बोलते नजर
अनामिक ओढ
बोलावे सारे थेट
शब्द फुटेना
स्पर्श रेशमी
शहारले मन
मधाळ स्मित
ह्रदय बंदिस्त
सखी समोरी
साथ जमेना
प्रेम होई सहजी
निभावणं कठीण
प्रेम मिळे सहजी
उमजणे कठीण