कठीनाही
कठीनाही
1 min
260
जीवन आहे सुंदर
मस्त जगायला शिका
कठीनाहीशी कधीतरी
सामना करायला शिका
अडचणींवर मात करा
आपुलकीचा हात धरा
बोलताना जपून जरा
निघणार नाही अश्रुधारा
तुम्ही होणार मग एक
आता का ठेवता भेद
परिवारात करू नका छेद
काम करा काही असं नेक
एकमेकांना समजून घेऊ
सुखाचा सर्वांना आनंद देऊ
प्रेमाने नात्यांना आपण जपू
कधी न दुसऱ्यांसमोर खचू
