कथा नतदृष्ट मानवाची
कथा नतदृष्ट मानवाची
1 min
301
Prompt 7
जर का असेल परग्रहावर जीवसृष्टी
तरी मानवाची फिरेल वक्र दृष्टी
स्थानिकांचा परक्यांचा अटळ संघर्ष
स्थानिक देखील घेतील त्यांचा परामर्श
अंतराळवीर चकित पाहून तेथील मानवा
जरी त्यांच्याकडे आहे सर्व गोष्टींची वानवा
तेथील ग्रह वासी चकित पाहून प्राणी नवा
दोघांनाही तेथे राहण्याचा हक्क हवा
माणूस तेथे देखील लावेल वाट पर्यावरणाची
जाईल तेथे करील कचरा कथा नतदृष्ट मानवाची
