कष्टाचे मोल
कष्टाचे मोल
1 min
473
ऊन-पावसात
शेतात राबतो
घामाच्या धारांत
माणिक मोती पिकवतो
घड्याळाच्या काट्यावर
गरागरा फिरतो
पोटाची खळगी
भरत असतो
गाथा थोर व्यक्तींची
माहितीच आहे
आपल्याला ही त्यातला
एक भाग व्हायचे आहे
आवडते काम
मिळतच नसते
मिळालेले काम
आवडीने करायचे असते
अंगी बाणावे
मूल्य आणि संस्कार
तेव्हाच आपलय जीवनास
येईल एक आकार
कष्टाच्या मोलाची
गोडी लय भारी
ती चाखायला
सर्वांना हवी खरी
