कष्ट
कष्ट
1 min
1.0K
दुःखात कष्टिले जीवन सारे
सुखात सगळा सोबती संसार
परिस्थितीची जाणली सदैव लाज
आज काळजात सगळ्यांच्या विहार
स्वतः जरी राहिले अल्पशिक्षित
मुलाबाळांचा आधी केला विचार
अमृत लागे कष्टाची चटणी भाकर
संस्कारांची शिदोरी लाभली आचार
कष्ट करुनि चीज झाले सफल
लेकरांची माया आई बापावर
आहे त्यागाची जाणीव अविरत
पुण्याईची मात आहे पापावर
