STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

2  

Sonali Butley-bansal

Others

क्षणांचा थांबा

क्षणांचा थांबा

1 min
309

विसावणार्या क्षणांना थोडं थांब म्हणायचे होते...

त्यांच्यासोबत थोडं रेंगाळायचं होतं

रेंगाळत रेंगाळत स्वतःला विसरायचं होतं...


अस्पर्शितेला थोडा स्पर्श करायचा होता

स्पर्शितेला थोडे न्याहाळायचं होतं...


शब्दांना थोडं थांबवायच होतं

अबोलतेला थोडे अनुभवायचे होते...


वेदनेला थोडा धीर दयावयाचा होता

जखमांना थोडं भळभळू दयायचे होते

बधीरतेला थोडी संजीवनी दयायची होती...


आठवणींना वर्तमानात आणायचं होतं

जगणं थोडं सुसह्य करायचं होतं

जगणं थोडं सुसह्य करायचं होतं


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍