क्षण ते सुखातले
क्षण ते सुखातले
आरंभ वळणाचा,
साशंक होऊनी चालला,
सवयीने अंदाज ,
भीड मनी मिटून गेला. १.
स्वतंत्रता आकारे,
भावनांना ते शब्द मिळे,
सादेला प्रतिसाद,
मिळूनी जगणे मोकळे. २.
प्रेरणेचा उत्साह,
शब्दांचे मग मोल कळे,
ओळखीने शब्दांच्या,
प्रगतीचे मार्ग वेगळे. .३.
सोबत लेखणीची,
हे अनोखे वळण मिळे,
माझ्याच मी चा खरा,
अर्थ मग नव्याने कळे .४.
शोध अस्तित्वाचा हा,
या जीवन मार्गावरचा,
त्या अनंत वाटांचा,
प्रवासातूनी प्रवासाचा. ५.
क्षण हे सुखातले,
आनंदाचे अन तृप्तीचे,
अखंड संगत ही,
फिरूनी मागणे वेळेचे. ६.
