क्षण मंतरलेले
क्षण मंतरलेले
1 min
288
क्षण हे आतुरलेले
प्रीतपिसारे फुललेले
त्या कोवळ्या वयात
भाव लाजरे हसले...
क्षण गंधीत कुसुम
सडा बकुळ फुलांचा
मंतरलेल्या क्षणांत
गहिवर अंतरीचा...
क्षण मोहरला आज
बहरले नभ धरा
तुझ्या समीप येण्याने
अंगी दाटला शहारा...
स्पर्श पहिला अधरी
रोम रोमी झंकारले
मनविणेचीया तार
छेडित कोण आले...
