STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

*क्षण मिलनाचे* (चाराक्षरी)

*क्षण मिलनाचे* (चाराक्षरी)

1 min
455

शांत कधी

खळखळ

ती सरिता

अवखळ.


ओलांडून

कातळांना

न्हाऊ घाली

त्या शिळांना.


घेई बघा

धाव कैसी

सागराच्या

मिलनासी.


घेऊनिया

प्रीत मनी

रोमांचित

शीत तनी.


अधीर तो

सागरही

फैलाविले

दो करही.


दिसताच

रत्नाकर

झाली नदी

अनावर.


भान सारे

विसरुनि

बसे ऐशी

बिलगुनि.


घेई तिला

तो कुशीत

एकजीव

ते खुशीत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन