क्षमा
क्षमा
1 min
256
राग अनावर होता
मन कलुषित होते
प्रेमभाव संपून हे
दूषित विचार येते
क्षमा या शब्दात आहे
कारणांचे उच्चाटन
अंगी धरता क्षमत्व
मिळे शांती समाधान
अनेक पाप-पुण्य हे
अवलंबून क्षमेवर
पुण्य कमावण्यासाठी
पाप त्यागा दूरवर
ऋषिमुनींचे सद्गुण
क्षमा भाव कमवून
सुखी जीवन करण्या
अंगी क्षमा असे गुण
क्षमा येई लहानास
आवर घाले रागास
शहाणपण सूचता
शांतीपूर्ण जगण्यास
