कसं कळावं...
कसं कळावं...
1 min
185
भाकरीची ती चव कळावी...
कशी कुणाला कष्टावाचून???
वाणी मधला ओघ कळवा...
कसा कुणाला बोलावाचून??
नयनातील जादू कळावी...
कशी कुणाला व्यथेपासून??
हस्तीचे ते कसे कळावे...
कसब कुणाला शिल्पावाचून??
जीवनातील अर्थ कळावा...
कसा कुणाला मरणावाचून??
