कसं असतं आयुष्य
कसं असतं आयुष्य
1 min
288
आयुष्यात खूप आनंद येतो
अपेक्षापण नसते इतका येतो की
आनंदात डोळ्यात ते पाणी आणतं
असंच आपलं आयुष्य असतं
खूप काही करायचे ठरवतो
खूप काही प्लॅन करतो
अचानक सगळं थांबतं
असंच आपलं आयुष्य असतं
घडून गेलेल्या रमणीय आठवणी
उगीच आपण वेड्यागत आठवतो
आठवताना स्वतःलाच त्रास करून घेतो
असंच आपलं आयुष्य असतं
मनावर करणारे घावपण हेच आयुष्य देतं
अन् मनाला सुख करणारे क्षण पण हेच आयुष्य देतं
जे हवं असतं ते मुळातच असं नाही
पण जखमा मात्र हे आयुष्य खूप देतं
खरंच असंच आपलं आयुष्य असतं
