कशासाठी
कशासाठी
1 min
197
निजल्या आकाशात
कुजबुजती चांदण्या
पाहतो चंद्रमा
कशासाठी?
भिजल्या श्रावणात
सळसळती पाने
बहरती राने
कशासाठी?
झिजल्या चंदनाचा
दरवळतो गंध
पसरतो वाऱ्यावर
कशासाठी?
सजला अंधार
लखलखती ज्योती
जळतात वाती
कशासाठी?
निसटता ओंजळ
हळहळती ऊरी
सावरती स्वतःला
कशासाठी?
विझते शरीर
गहिवरते मन
ओलावती पापण्या
कशासाठी?
