STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

करुया स्वागत सृष्टीच्या सृजनाचे

करुया स्वागत सृष्टीच्या सृजनाचे

1 min
478

वसंत ऋतुचे होता आगमन 

भिरभिरती फुलांवरी फुलपाखरं!

फळांफुलांतील मधुकण प्राशण्या

मधमाश्या आनंदे सदा तत्पर!


आम्रवृक्षावर बघूनी मोहर 

तान छेडतो कोकीळ सुस्वर!

कमळातील घेतअसता परीमल 

होई का कैद बेधुंद तो भ्रमर?


नभी दाटुनी घननीळ येता 

पिसारा फुलवून नाचे मयूर!

हूंगण्या सुगंध ओल्या मातीचा

खोंड घेतसे धाव का सर्वदूर!


पावसाचा पिण्या थेंब पहिला

असे का चातक सदा आतूर?

नसतांना मधुर स्वर रे तुझा

धरतोस कारे बेडका तू सूर!


भिजता धरित्री पर्ण डोकावती

अंकुरातुनी करीत नमस्कार!

अभिवादन करावे ते सृजनत्वाचे 

वृक्ष प्राणी पक्ष्यांतही असे संस्कार!


वर्षाऋतुचे जणू करण्या स्वागत

घेवुनी शंख पाठीवर उभी गोगलगाय!

सोहळा सृष्टीचा संपन्न होता सर्वांसाठी

मानवा का जाई पळूनी रे काढीत पाय!


Rate this content
Log in