STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

3  

yuvaraj jagtap

Others

करू नववर्षाचे स्वागत (कविता)

करू नववर्षाचे स्वागत (कविता)

1 min
2.1K


करू नववर्षाचे स्वागत


माना जुन्याचे आभार

दिला जीवना आकार

पेरा ध्येयाचा विचार

स्वप्ने करा ही साकार


नव्या आशा नको नशा

नीती पाळा क्लेश टाळा

प्रेम माया शांती मनी

जुने दोष पूर्ण जाळा


सुख दुःखाची बेरीज

वर्ष हिशोब रे मांडी

सुख सोबत घेऊनि

फोडा दुःखाची रे अंडी


गोड कटू अनुभव

करा सारा लेखाजोखा

गोड धरा रे जमेत

लावा कटूला तडाखा


जीवनाच्या रे गाण्यात

मस्त मजेत गाऊ दया

करूणेस घाला बांध

प्रेम सागर वाहू दया


सदा निष्कलंक रहा

किती होवोत आरोप

सत्य शिदोरी बांधुनि

द्यावा जुन्यास निरोप


शिकवूनी रे बरेच

जुने हे सरुनी गेले

मनी फुलू द्या रे हर्ष

नववर्ष दारी आले




साहित्याला गुण द्या
लॉग इन