करते मी प्रार्थना
करते मी प्रार्थना
1 min
399
फिरले मी उपाशी
आधार कोणाचा नाही
पाठीवरी माझ्या
हात कोणी ठेवला नाही
सांगू कोणाला माझी दैना
पण रडत नाही बसली मी एकटी
प्रश्न सगळे घेऊनी
चालत निघाले वाटेवरी
होते माझ्या पंखात बळ
न थांबता चालत राहील
झेप घ्यावे या संकटाशी
इच्छा माझ्या पूर्ण व्हाव्या
हेच मागणे माझे देवापाशी
साठवणी अश्रु नयनी माझ्या
घोटाळ्यात ओ जीवन या एकांतपणी
स्वप्ने मनी दाटले माझ्या
कधी सोडवेल आयुष्याचा गुंता
प्रश्नाचे उत्तर मिळेल काय?
आशा उराशी ठेवल्या मी
पूर्ण होवो इच्छा माझ्या
हीच प्रार्थना करते देवापाशी
