कृष्णकळी राधा..
कृष्णकळी राधा..
अनुपम जगी
प्रीतीचा उगम
राधा आणि श्याम
जन्मोजन्मी...१
राधा कृष्णप्रिया
शाम मनोहारी
प्रीत संज्ञा न्यारी
जगामाजी...२
गंधी मोहरली
मृदू कृष्णकळी
कृष्णाची पाकळी
प्रेमोद्यानी...३
यमुनेच्या तीरी
मुरली मधूर
राधिका अधीर
भेटीसाठी... ४
प्रीती आणि भक्ती
अनोखा मिलाप
झडताती ताप
घेता नाम...५
सर्व पाश मुक्त
बंधन पवित्र
संसारास सूत्र
शिकविते...६
जगाच्या वेगळे
राधाकृष्ण बंध
हरीनामी धुंद
राधा नित्य...७
देही वेगळाले
एक चित्ती होती
समसामावती
एकमेका..८
जप "राधे राधे"
जाई कृष्णाठायी
सुख तुझे पायी
अविरत...९
एक श्वास ध्यास
राधेश्याम गाऊ
चला लीन होऊ
त्यांचे पायी...१०
