STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

कृष्णांबरी

कृष्णांबरी

1 min
200

अंबरी नाजुकशी

चंद्रकोर हसे

गोकुळी नंद निवासी

नंदलाला वसे....


सोमचंद्र दाखवी

विविध कला

कान्हा करी

यशोदांगणी बाललीला...


असती कैक नक्षत्रे

आणिक चंद्रासवे

यमुनातीरी गोपिका

खेळ खेळती मुकुंदासवे....


प्रियतमा रोहीणी

नाव तयाचे प्रजापती...

प्रियसखी राधा

नाव सख्याचे रूक्मिणीपती


Rate this content
Log in