STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

कृष्णा सुदामा मैत्री

कृष्णा सुदामा मैत्री

1 min
1.8K

गरीब श्रीमंतीस नाही थारा 

नात्याला मैत्रीचा प्रेमळ पान्हा... 

आनंदाला अश्रूंचा आसरा 

हरपले सुदामा नि कान्हा... 


कृष्णा सुदामाची मैत्री जोडी 

जणू विश्वासाचा अथांग सागर... 

दुराव्याचे अंतर नाही मनात 

अपार जिव्हाळ्याची घागर... 


भेटीवेळी मनातले अबोल भाव 

डोळ्यातल्या लगबगीत कैद... 

क्षणात विश्वाचा कर्ताधर्ता 

सुदामाच्या पोह्यात नजरकैद...


कालौघात कोण ठरेल स्वार्थी 

धाकधूक सुदामाच्या मनातली... 

पाहून प्रेम कृष्णाचे मन विव्हळले

समाधानाची प्रेम भावना दाटली... 


मनातली घालमेल ओळखून 

वैभवी थाट सुदामास देऊ केला... 

मित्रत्वाचा खरा दागिना विश्वाला 

या प्रेम जोडीतून जणू गवसला... 


Rate this content
Log in