कृष्ण लीला
कृष्ण लीला
यमुनेच्या
तिरावर
बासरीच्या
तालावर ....१
रास रंगे
कृष्णा सवे
खेळ रंगे
गोपांसवे....२
लिला तुझ्या
साद देती
गाई तुझ्या
हंबरती....३
नंदलाला
गुंतलेला
गोपकाला
रंगलेला....४
पितांबर
शोभेतुज
मोरपीस
डोई तुज ....५
ह्दयावरी
वैजयंती
ओठावर
बासरीती ....६
तुझी राधा
धाव घेई
रानोमाळी
शोध घेई ....७
चक्षुतून
अश्रु वाहे
अनवाणी
धाव राहे ....८
राधा तुझी
वेडीपिशी
सदाराहे
तुजपाशी ....९
सांजवेळी
परतती
गाई साऱ्या
गोठा येती ....१०
वासरास
हंबरती
ममतेने
निहाळती ....११
माय तुझी
यशोदाही
वाटेकडे
नजरही ....१२
माऊलीची
वेडी माया
काळजाची
होई रया ....१३
कान्हा तुज
पाहताच
ओवाळते
मायेनेच ....१४
लिंबलोन
काढूनिया
नजरेत
भरतीया ....१५
रूप तुझे
नंदलाला
वेड लावी
ममतेला ....१६
