STORYMIRROR

angad darade

Others

3  

angad darade

Others

कर्माची फळे

कर्माची फळे

1 min
194

ढाळले अश्रू नयनातुनी एकांतात

पाहिले ते कोणीच नाही

वाहिल्या लोचनातूनी धारा

पुसले त्याशी कोणीच नाही


कर्माची फळे आली भोगावयाशी

आयुष्यात पुण्य उरलेच नाही

पापी मनुष्य असा जाहलो मी

सत्कर्म हातून घडलेच नाही


छळले असेल का कोणाशी मी

पाठीराखा मज कोणीच का नाही

दोष देऊ उगीच कोणास आता 

निर्दोष तर मी स्वतःहाही नाही


एकांत क्षणी लावतो हिशोब सारा 

माझ्या सारखा पापी इथे कोणीच नाही

उरले न सुख आयुष्यात माझ्या

देवा जगण्याची आज इच्छाच नाही


केलती कृपा ईश्वराने मजवरती 

दुष्कर्म पण मी सोडलेच नाही

ऊतू गेले कुकर्म माझे सारे

देवा मज हे कळलेच नाही


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍