STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Others

3  

शिवांगी पाटणकर

Others

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

1 min
231

स्त्रियांसाठी लढल्या त्या

स्त्रियांसाठी झटल्या त्या


स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या त्या

दगड अन् शेण अंगावर घेऊन ही लढणाऱ्या त्या


स्त्री शिक्षणासाठी केलं त्यांनी खूप काही सहन

तरी राहिल्या त्या लढत करुनी विचार गहन


धूळपाटीवर मातीच्या मनोरे ज्ञानाचे रचून

ज्ञानी बनवण्यासाठी समाजाला आल्या पुढे सरसावून


झोपलेल्या अंधार पांघरूण समाजाला युगानुयुगे

आयुष्य सारे गेले त्यांचे करण्यास त्यांना जागे


संघर्षांना अनेक जावून सामोरे हार कधी त्यांनी मानली नाही 

आत्मविश्वासाने त्या सामोऱ्या गेल्या धैर्य आपले खचु दिले नाही


जाज्वल्य ज्योत स्त्रिशिक्षणाची ठेवूनी मनात तेवत

मिळे पर्यंत यश त्या खंबीरपणे राहिल्या लढत


विधवा अन् अस्पृश्यांसाठी ही त्यांनी केले महान कार्य

मर्यादित नव्हते त्यांचे केवळ शिक्षण क्षेत्रापुरते कार्य 


होत्या त्या शिक्षिका, समाजसुधारक अन् कवयित्री

सांगावी किती महती आहे साऱ्या जगात त्यांची ख्याती


अनन्यसाधारण प्रतिभावंत त्या साऱ्यांच्या आई

आदर्श साऱ्यांच्या ठरल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई


Rate this content
Log in