करा निघायची तयारी
करा निघायची तयारी
1 min
345
गाळण उडाली, समोर यमाची स्वारी
चला! , आवरा,करा आता नाघायची तयारी
कुणी घर दाखवलं, पत्ता दिला कोणी
घामाने भिजलो, अन् येऊ लागली घेरी
काही तरी गडबड झाली, पिडा आली
नाव सारखं जा तो , शेेजारचा पुढारी
गयावया केेेली, तया दया नाही आली
बुद्धी बंद पडली, वा चालेना हुशारी
श्वास गुदमरून, आवळूू लागला फास
सोबत घेऊ का, काही तरी आस
प्राॅपर्टी नावे, चल सातबारा करून देतो
वेडाच रे, नाही कसा तूू एकटा भिकारी.....
