STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

कपबशी

कपबशी

1 min
486

कधी मी कपात तर

कधी असते बशीत|

कधी खू्प क्रोधात तर

कधी खूपच खुशीत||१


कपातला चहा शीघ्र

थंड होता होईना|

बशीतला चहा गरम 

राहता राहिना ||२


कधी माझा राग

शांत होता होईना|

कधी प्रयत्न करुनही

मला क्रोधच येईना||३


प्रत्येकाचे बहुदा 

असेच होत असते|

आपले आपल्यालाच

काही कळत नसते||४


जवळचे आपल्याला

दूर वाटत असते|

तर दूरचे आपल्याला

जवळ भासत असते||५


दिसते तसे नसते

म्हणूनच जग फसते|

सत्य त्यागून असत्यच

कवटाळत का बसते||६


Rate this content
Log in