कोसळणाऱ्या सरिंनो
कोसळणाऱ्या सरिंनो
1 min
252
कोसळणाऱ्या सरींनो जा तुम्ही माघारी
पाणी पाणी झाली ही धरती सारी
भरले तळे, डबके आणि मोकळे हे रान
नटली सारी सृष्टी आणि फुलले हे जीवन
आले सुख सारे धाऊन माझ्या दारी
शमले सारे तृषर्थ अन भागली तहान
अंकुरले तृण आले सागरी उधाण
फुलले नवे चांदणे निळ्या अंबरी
संपले सारी दुखः आणि आली ही समृद्धी
खोपटात प्रकाशाची झाली आता वृद्धी
युगायुगाची कात टाकते लाचारी
आता निळ्या अंबरी फिरवेसे वाटते
झुल्यात अम्राईच्या झुलावेसे वाटते
झाली लाटांची गर्दी मनाच्या सागरी
