STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

कोरोनातले नेटवर्किंग

कोरोनातले नेटवर्किंग

1 min
146

कोरोना काळात एकच आधार 

साथ त्याला नेटवर्किंगची मिळे,

मनोरंजनाचे एकमेव साधन 

सामाजिक माध्यमांशी नाते जुळे.


व्हाट्सअप वरच्या समूहात 

मिळेल घालण्यास दंगा, 

ट्विटर वरती जाऊन 

घेऊ नका कोणाशी पंगा.


जरी दूर दूर असले सगळे 

नेटवर्किंग ने जवळ आले, 

आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे 

सगळीकडे वाहू लागले. 


घर बसल्या कामे होई 

आधुनिक विचार अंगीकारी, 

बाहेर कुठे न जाता आता 

ऑनलाइन शॉपिंग होते भारी. 


रोजच्या घडामोडींचा आढावा 

एका बटनावर सहज मिळे, 

जरी असला कोरोना बाहेर 

घरात गुंफे नेटवर्किंगचे जाळे.


Rate this content
Log in