कोरोनाचे सावट
कोरोनाचे सावट
पुन्हा एकदा जगात
महामारीने थैमान घातले
कलम १४४ सर्वांनाच
लागू पडले.....
डोळ्यांनी साध्या
अजिबात दिसेना
एवढासा विषाणू
एका जागी राहीना...
कोरोना सोबत
आपली लढाई मोठी आहे
कायद्याचे पालन करणे
हीच आपली खरी धिटाई आहे...
साऱ्या जगाला घेरले
मृत्यूचे थैमान घातले
तरीही करण्या त्याचा सामना
डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार तत्पर जाहले....
स्वच्छतेची धरा कास
मिळवू नका हातात हात
थांबेल रोगराईचे थैमान
लांब राहूनी करुया कोरोना वर मात....
एकजुटीची मशाल
घरात राहून पेटवू
आलेल्या या महामारीला
मूळापासून नष्ट करु.....
सृष्टीच्या विनाशाची
कोरोना ही झलक आहे
नाही सुधारलात आताही
तर सृष्टीचा विनाश अटळ आहे...
