कोरोना
कोरोना
आला गं बाई आला गं बाई आला गं
आला गं बाई आला गं बाई आला गं
आला आला आला आला
हो हो हो
आला आला आला आला
कोरोना आजार आला
रं नीट बघ
कोरोना आजार आला
कारणं तुम्ही जाणा हो सारी
लक्षणंही समजून घ्याना सारी
हो सारी
सारेजण बोला
कोरोना आजार आला।।1।।
खोकला आणि सर्दी ताप
डोकेदुखी आपोआप
संशय येता जराही
वेळ नका दवडू थोडाही
उपचार कराया चला हो
तुम्ही उपचार कराया चला।।2।।
असेल जरी आवड खास
खाऊ नका तुम्ही मांस
विदेशाची वारी टाळा ना
स्वच्छतेचे नियम पाळा ना
गर्दीचे ठिकाणही टाळा हो हो
तुम्ही गर्दीचे ठिकाणही टाळा ।।3।।
खोकताना, शिंकताना
रुमाल तोंडावर धरा ना
हात हाती नको ना
नमस्ते दुरुन बरा ना
मास्क तुम्ही घाला हो
मास्क तुम्ही घाला घाला।।4।।
विषाणूचे तोडू पाश
करू त्यांचा पुरता नाश
नका बसू भीती बाळगून
कोरोनास लावू पळवून
देश सज्ज झाला हो
देश माझा सज्ज झाला झाला ।।4।।
