कोरोना
कोरोना
आला कोठून तू कोरोना
परदेशातून येऊनी तू सोबत सर्दी खोकला आणलास
तू असा जाणार नाहीस माहित आहे आम्हाला
कळलं आम्हाला आम्ही वेळीच काळजी घेऊ
पळवतो की तुला खरी आमची हीच परीक्षा
विदेशात आमचे नातलग असती
हाती पैसा ते घेऊन गेले
येताना तुला सोबत आणले
तुझ्या येण्याने काम थांबले, देश थांबला
सगळे कसं स्तब्ध झाले
डॉक्टर, नर्सेस, वार्डबोय सगळे लढा देऊनी
तुला बाहेर कसे काढायचे ते बघत आहे
मोदी सारखे नेते ह्यावर तोडगा काढत आहे
पण हे माणसा कळत नाही का तुला
संचारबंदी असूनही तू बाहेर का फिरतो आहे
वेळीच काळजी घेऊनी
घरीच बसून रहा फक्त हाच त्यवरी उपाय आहे
कृपा करून आल्या पावली तू परत जा रे बा
