कोरोना विषाणू
कोरोना विषाणू
1 min
316
सर्वत्र आहे विषम परिस्थिती
रोज दुःखद वृत्त कानी येत आहे
भावपूर्ण श्रद्धांजली लिहायला
हात देखील थरथरत आहे
असा कसा हा विषाणू आला
जवळच्या सर्वाना दूर करत आहे
मनात असून काही करता येईना
स्वकीयांचा स्पर्श विटाळ ठरत आहे
रुग्णसंख्या वाढू लागली तसे
आरोग्यसेवा अपुरी पडत आहे
दवाखान्यावर ठेवला विश्वास पण
प्राणवायूच घातवायू ठरत आहे
