STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

कोरोना व्हायरस कळे

कोरोना व्हायरस कळे

1 min
403

जळत्या निखाऱ्यावर

ठेवता कशाला रे पाय?

पायालाही बसता चटके

कराल तुम्ही काय? १


काय भीषण कोरोना त्याला

अटकाव करणार की नाय?

नायतर तोच करेल गिळंकृत

पसरून शरीरात पाय २


पायदळी तुडवू नका सुचना

ज्या प्रशासन तुम्हा देत हाय

हाय खाण्या पूर्वीच त्याला 

नेस्तनाबूत नि करायचं बाय ३


बाय बाय करून त्या कायमचेच

जग आपल्याला दिसणार हाय 

हाय करू मेसेज तो पाठवूनच

मारु गप्पा कसे आहात नि काय ? ४ 


काय नको ग्रुप नको रे

बाहेर खानावळीत रे जाणे

जायला हवं पोटात घरचं 

बनवलेलं पौष्टिक ते खाणे ५


खाण्यासोबत घरात बैठे 

खेळ खेळू गाऊन गाणे

गाणे गात सेवाकर्त्यांसाठी 

देवाकडे मांडू गाऱ्हाणे ६


Rate this content
Log in