कोरोना सुरक्षा उपाय
कोरोना सुरक्षा उपाय
1 min
369
हात ठेवा सतत तुम्ही
धुवा स्वच्छ साबणाने |
वाचवायला हवं स्वत:ला
जर विषाणू कोरोनाने | |१| |
सर्दी, ताप, खोकल्यावर
इलाज करा तुम्ही तुरंत |
कोरोनला लांब ठेवा
करुयात त्याचा अंत | |२ | |
विनाकारण हिंडत
पडू नका घराबाहेर |
कोरोनाचा विषाणू
घेऊन याल आहेर | |३| |
तोंडाला लावा रुमाल
खोकताना शिकतांना |
जपा लहान वयोवृद्धांना
कोरोनाशी लढतांना | |४ | |
लस, औषधं उपलब्धच
नाहीत आज कोरोनावर |
ठेऊ नका अंधविश्वास
कोणत्याही अफवांवर | |५ | |
