STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

कोरोना शाळेतच का?

कोरोना शाळेतच का?

1 min
200

कोरोना तू किती हुशार आहेस रे,

तू गल्लीत येत नाही,

तू बाजारात येत नाही,

तू यात्रेत येत नाही,


तू धर्मतीर्थावर येत नाही,

तू सरकारी कार्यालयात येत नाही,

तू रॅलीत येत नाही,

तू सभेत येत नाही,

 तू मतदान क्रेंद्रावर येत नाही,


तू लग्नात येत नाही,

तू मयताला येत नाही,

 तू सलून मध्ये येत नाही,

तू जिममध्ये येत नाही नाही,


तू चहाच्या किंवा जीवनाच्या हाॅटेल मध्ये येत नाही,

तू फक्त येतो मुलांच्या शाळेतच का बरं?

शाळेतील मुले तुझ्या पेक्षा हुशार होतील म्हणून का

तुला मुलाशीच विरोध का?

तुला शाळेतच रहायला आवडते का? 


साहित्याला गुण द्या
लॉग इन