STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

कोरोना नियम

कोरोना नियम

1 min
246

निराशेची अशी आली लाट

कोरोनाने संपविला सारा थाट

श्रीमंत नाही ना गरीब नाही

साऱ्यांनाच सुटला थरथराट


ज्याने पाळले योग्य सर्व नियम

वागण्यावर ठेवला जरा संयम

मुळीच त्रास झाला नाही त्यांना

कोरोनामुक्त होते असे कायम


तोंडावर नेहमी मास्क वापरा

वारंवार हात स्वच्छ धुवा

दोघांत सुरक्षित अंतर ठेवा

नाही तर म्हणाल, हे देवा !


प्रशासनाचे सर्व नियम पाळा

कोरोनाचा होणारा प्रसार टाळा

घरी राहा कुटुंबात सुरक्षित राहा 

प्रत्येक दिवस ठरतोय काळा


जीव असेल तर कमावू संपत्ती

म्हणून जीवाची घ्यावी काळजी

आजचा दिवस उद्या येत नाही

आनंदात जगावे नको काळजी


Rate this content
Log in