STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

कोरोना गीत

कोरोना गीत

1 min
171

या कोरोनाने किती छळलं गं बया

साऱ्यांनाच घरात बसवलं गं बया


सर्व कारखाने दुकाने आहेत बंद

रोजचा कामधंदा भी आहे मंद

कोणाच्या चेहऱ्यावर नाही आनंद

सर्वांचे भविष्य झालंय अंदाधुंद

काहीच सुधरणा चाललंय गं बया

साऱ्यांनाच घरात बसवलं गं बया


कुण्याच्या घरात जायचं नाय

कुणाच्या दारात थांबायचं नाय

हातात हात मिसळायचं नाय

कुणाच्या मौतीला भी जायचं नाय

कसे विपरीत दिस आलंय गं बया

साऱ्यांनाच घरात बसवलं गं बया


शिक्षण नसल्याने पोरं झाली बेजार

अनेक युवा तरुण झाले बेरोजगार

कामाला मिळेना कोणी एक कामगार

बाजारताला ठप्प झाला पहा व्यवहार

प्रत्येकाचं गणित बिघडलं गं बया

साऱ्यांनाच घरात बसवलं गं बया


आमची संकटातून सुटका कर ना

हात जोडून करतो आम्ही प्रार्थना

लवकर निघून जा रे बाबा कोरोना

आम्हाला सुख शांतीने जगू दे ना

देवाला असं नवस केलं गं बया

पुढे चांगले दिवस येतील गं बया


Rate this content
Log in