कोरोना...अंधश्रद्धेला नको थारा
कोरोना...अंधश्रद्धेला नको थारा
आपापल्या कर्तव्याची नि सहानुभूतीची ठेऊन जाण
देवाचं देवपण आहे माणसास माणूस समजण्यात
विश्वासाच्या मोतींनी आपल्या जवळच्या माणसांची
प्रेमाने नि मायेने हृदयात फुलमाळ ओवण्यात
देवावर जरूर असावी अपार श्रद्धा पण नको अंधश्रद्धा
डॉक्टर, नर्स यांच्यात बघा माणूसरुपी प्रेमळ देवदूत
अतिरेकी विश्वासाचा इथे भोंदूगिरीने जातो जीव
म्हणुनी श्रद्धेसोबत धरावे वैचारिकतेचे विचारी सूत
विषाणूस या नाही उपलब्ध एक प्रभावी उपचार
अधिक काळजी घेणे हाच एक मात्र आहे सहारा
आधीच माजलेली अमानुषतेची भयानक महामारी
अति अविचारी विश्वासातून नको अंधश्रद्धेस थारा
