कोणीतरी नक्की असावं
कोणीतरी नक्की असावं
1 min
237
उगीच रडले वाटले मला आता
सतावतो हा एकांत वाटलं कविता करावी आज
वाटे मज हवी सोबत हवी कोणाचीतरी
रडले तेव्हा वाटे अश्रू माझे पुसावे कोणीतरी
वाटलं तेव्हा कोणीतरी सोबत नक्की माझ्या असावं
जीवनी यश खूप मिळाले
वाटलं कुठेतरी काही हरवल्यासारखा
पदरी निराशा येत गेली तेव्हा
माझ्या ह्या निराशेच्या दिनी साथ हवी कोणाचीतरी
वाटलं आपला पण कुणीतरी लाड करणार असावं
वेगळ्या टोपण नावाने हाक मारणार असावं
नाव उच्चारताच मन आनंदाने भरून जावं
वाटे जीवनी माझ्या नक्कीच कोणीतरी असावं
