कोणीतरी असावे
कोणीतरी असावे
1 min
336
कोणीतरी असावे आयुष्यात आपुले
सांगावे मनातले त्यांच्यासंगे
कोणीतरी असावे मार्गात आपुले
थांबावे माझ्यासाठी सांगण्यासाठी मनातले
कोणीतरी असावे प्रेमाचा वर्षाव करणारे
एकाकीपणा संपण्यासाठी माझ्या संगतीने
कोणीतरी असावे आयुष्यात सहभागी आपुले
सुखात कायम साथ देण्याचा सोबतीने
कोणीतरी असावे आपले दुःख ऐकणारे
दुःखातून मार्ग काढणारे कायम साथ देणारे
कोणीतरी असावे सावलीसारखे सोबत
माझ्यासाठी जगणारे माझ्यासाठी मारणारे
