STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

4  

Vrushali Khadye

Others

कोकणातील मज्जा!

कोकणातील मज्जा!

1 min
844


लपवू नका,छपवू नका

गावातून आणलं काय दावा

कोकणचा मेवा,गोड गोड ठेवा

कोकणातनं आणलयां रानमेवा

जरा आम्हां द्यावा

आधी काय सांगतो ते ऐका

देतो रानमेवा

अरे,काय सांगतो ते ऐका..||धृ||


कोकणात सारे जाऊया अन्

खूप सारी मज्जा करूया

अरे नको बाबा कोकणात

मजा आहे शहरात

उन्हाळी सुट्टीत जाऊया

जाऊ केळीच्या फडात 

सोलून देई पुढ्यात

दूध,साखर घालून शिकरण खावा

शिकरण खावा

आधी काय सांगतो ते.....||१||


आंब्याचा वनात जाऊया

हिरवीगार आमराई पाहूया

कै-या बी तोडू नि लोणचं बि करू

अन् गार गार पन्हं पिऊया  

जाऊ काजूच्या बागांत 

बोंडे टाकू तोंडात

ओल्या सुक्या काजूचे गर खावा 

गर खावा

आधी काय सांगतो ते....||२||


नारळाच्या बागात जाऊया 

सुपारीची झाडे पाहूया

उंच माडावर चढू

नारळ काढू

अन् शहाळ्याचे पाणी पिऊया

उंच डोंगरमाथा

घालूया पालथा

जांभळे,करंवदे खाऊ रानमेवा 

काळा रानमेवा

आधी काय सांगतो ते....||३||


नदीकिनारी जाऊया

खोल खोल पाण्यात डुंबूया

पाण्यातली मासळी,गळाने पकडू

ताजे मासे अन् भाकरी खाऊया

जाऊ गुरांच्या गोठ्यात

हात घालू शेणात

गाई,म्हशीचे निरसे दूध पिवा

फेसाळ दूध पिवा

आधी काय सांगतो ते....||४||


Rate this content
Log in